"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 02:27 PM2021-05-17T14:27:15+5:302021-05-17T14:30:02+5:30

Tauktae Cyclone : वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन घेतला होता परिस्थितीचा आढावा.

bjp leader keshav upadhye slams cm uddhav thackeray Tauktae Cyclone work from home ajit pawar mantralaya | "अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"; भाजपचा टोला

"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"; भाजपचा टोला

Next
ठळक मुद्देवादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन घेतला होता परिस्थितीचा आढावा.राज्यात मंत्रालय आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार म्हणत भाजपचा टोला

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे Work From Mantryalay कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी, त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी मंत्रालयात आपत्तीनिवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली, मुख्यमंत्री कधी दिलासा देणार?," असा सवाल भाजप महाराष्ट्रचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. 





"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसानं मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हलले नव्हते. इथे लोकांना work from home करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुद्धा आहे हे कधी लक्षात येणार?," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. "महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळवला. मुख्यमंत्री तर 'वर्क फ्रॉम होम मिनिस्टर' झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरनं किमान 'वर्क फ्रॉम मंत्रालय' तरी करून दाखवावं," असंही उपाध्ये म्हणाले. 

Web Title: bjp leader keshav upadhye slams cm uddhav thackeray Tauktae Cyclone work from home ajit pawar mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.