मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे आरोप केले आहेत. यानंतर भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली."गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिंग यांचं धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिद्ध करण्याच विडाच उचलला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे," अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
राज्यातील सरकार खंडणीखोरांचं, गुन्हेगारांचं हे सिद्ध करण्याचा विडाच उचललाय; भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:46 PM
Prambir Singh : गृहमंत्र्यांनी वाझे यांना दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला
ठळक मुद्देगृहमंत्र्यांनी वाझे यांना दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबिर सिंग यांनी पत्राद्वारे केलाकाही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांची करण्यात आली होती बदली