Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:48 PM2021-04-27T18:48:49+5:302021-04-27T18:51:06+5:30

Coronavirus Vaccination Maharashtra : १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांचं होणार लसीकरण. राज्याला १२ कोटी डोसची आवश्यकता असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.

bjp leader keshav upadhye slams maharashtra government coronavirus vaccine free or chargable | Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

Next
ठळक मुद्दे१ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांचं होणार लसीकरण. राज्याला १२ कोटी डोसची आवश्यकता असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचं राज्यानं उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचंही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनीदेखील ट्वीट करत पुरेशा लसीचा पुरवठा झाला असता तर राज्यानं दोन कोटींचा टप्पा ओलांडला असता असं म्हटलं दरम्यान, आता १ मे पासून होणाऱ्या तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय आणि हे लसीकरण मोफत आहे का सशुल्क असा सवाल भाजपनं केला आहे.

"महाराष्ट्रात क्षमता आहेच, पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळ रोज सरासरी २ लाख लसीकरण झालं. या संथगतीला इथलं सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे. पण लसीकरणाचं नियोजन नीट केल नाही हे वास्तव आहे. आता १ मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय? लसीकरण मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या?," असे सवाल करत महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर टीकेचा बाण सोडला.



बुधवारी निर्णयाची शक्यता

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढत असताना राज्यातील आकडेवारीनं काहीसा दिलासा मिळाला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारनं लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या याबद्दलचा निर्णय होऊ शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठत आहे. त्यात मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो. १८ वर्षांवरील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याबद्दलच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली आहे. याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकेल, असं उत्तर पवार यांनी दिलं.

Web Title: bjp leader keshav upadhye slams maharashtra government coronavirus vaccine free or chargable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.