शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 6:48 PM

Coronavirus Vaccination Maharashtra : १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांचं होणार लसीकरण. राज्याला १२ कोटी डोसची आवश्यकता असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.

ठळक मुद्दे१ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांचं होणार लसीकरण. राज्याला १२ कोटी डोसची आवश्यकता असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचं राज्यानं उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचंही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनीदेखील ट्वीट करत पुरेशा लसीचा पुरवठा झाला असता तर राज्यानं दोन कोटींचा टप्पा ओलांडला असता असं म्हटलं दरम्यान, आता १ मे पासून होणाऱ्या तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय आणि हे लसीकरण मोफत आहे का सशुल्क असा सवाल भाजपनं केला आहे."महाराष्ट्रात क्षमता आहेच, पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळ रोज सरासरी २ लाख लसीकरण झालं. या संथगतीला इथलं सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे. पण लसीकरणाचं नियोजन नीट केल नाही हे वास्तव आहे. आता १ मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय? लसीकरण मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या?," असे सवाल करत महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर टीकेचा बाण सोडला.बुधवारी निर्णयाची शक्यताराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढत असताना राज्यातील आकडेवारीनं काहीसा दिलासा मिळाला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारनं लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या याबद्दलचा निर्णय होऊ शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठत आहे. त्यात मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो. १८ वर्षांवरील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याबद्दलच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली आहे. याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकेल, असं उत्तर पवार यांनी दिलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपेAshok Chavanअशोक चव्हाण