शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 8:53 AM

भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका. पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : भाजप

ठळक मुद्देपडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : भाजप

भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला होता. दरम्यान भाजपनंही प्रत्युत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे.

"पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे. विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. "अभिमान आहे बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन इतरांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात. बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपाचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का?," असा सवालही त्यांनी केला आहे. 

काय म्हटलंय अग्रलेखात?दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात.

भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?’’ अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस(Devendra Fadnavis) किंवा चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) कोण?

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना