मुंबई: भारतीय जनता पक्षाचे(ऴऱझ) नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिली.
मोहित कंबोज यांचे ट्विटमोहित कंबोज यांनी ट्विट केले की, 'माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप केले. यामुळे आमची प्रतिमा खराब झाली. त्याबद्दल मी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा नुकसानीचा दावा दाखल केला आहे.'
नवाब मलिकांचे अनेकांवर आरोपमहाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. आता मोहित कंबोज यांनी मलिकांवर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकल्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या दाव्याला मलिक काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
नोटीस देऊनही मलिक थांबले नाहीतएका वृत्तानुसार, भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही नवाब मलिक यांनी 11 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज यांच्यावर अनेक आरोप केले.