शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'अति शहाणा त्याचा बैल रिकामा': निलेश राणेंचा राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 9:57 AM

भाजप-शिवसेनामध्ये सुरु असलेला वाद अधिकच वाढताना दिसत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले भाजप-शिवसेना पक्ष, निवडणुकीच्या निकालानंतर मात्र एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'संज्या तुझ्यासाठी मराठीत एक म्हण आहे.' “अति शहाणा त्याचा बैल रिकामा”, असा खोचक टोला निलेश राणे यांनी राऊत यांना लगावला आहे.

भाजप-शिवसेनामध्ये सुरु असलेला वाद अधिकच वाढताना दिसत आहे. आता या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहे. रविवारी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर काही तासाच्या आताच दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यांनतर आता निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन करताना एक व्हिडिओ शेअर करत, शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नसल्याचे राऊत म्हंटले होते.

यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. संज्या तुझ्यासाठी मराठीत एक म्हण आहे. “अति शहाणा त्याचा बैल रिकामा”, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात सुरु असलेला वाद  वाढण्याची शक्यता आहे.