मुंबई :पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. संजय राठोड यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले, असे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (bjp leader nilesh rane criticized sanjay rathod)
सुमारे १५ दिवसानंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहोरादेवी गडावर सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे चालली. पत्रकार परिषदेची सुरुवातच संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली आणि आपली बाजू मांडली. यावेळी जमलेल्या गर्दीवरून निलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली.
काय म्हणाले निलेश राणे
''शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे'', असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला.
संजय राठोड यांनी कृत्याची कबुली द्यावी, समाजाची दिशाभूल करू नये: शांताबाई राठोड
संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय
सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका
चित्रा वाघ यांचीही टीका
आताच्या घडीला बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरले. समाजाला वेठीस धरायचे हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.