Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा हटवण्यात आली याबाबत मी आधीच आपणास कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देणारे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती तुम्हाला देत आहे, असे पत्र लिहित संजय राऊतांनी तक्रार केली. यानंतर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.
...मग संजय राऊतांच्या बाजूला बसलेला संत आहे का?
नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, हा जो बाजूला बसलेला आहे तो काय मोठा संत आहे का? गुंडांना मांडीवर घेऊन फिरायचं आणि उगाच दुसऱ्यांवर पिसाळलेल्या कुत्र्या सारख भुंकत बसायचं.. हातभर फाटलेली स्वतःची.. बाता करतो मर्दाची!!, असे ट्विट करत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचे नाव निलेश पराडकर असल्याचे सांगितले जात आहे. निलेश पराडकर याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. छोटा राजन टोळीतील खून-खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पराडकर याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"