गाड्यांमध्ये हॉर्नच्या जागी भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सच्या आवाजांचा वापर केला जाऊ शकेल, असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सायरनएवजी आकाशवाणीवर वाजवल्या जाणाऱ्या मधूर संगिताचा वापल्या होऊ शकतोका यावरही विचार सुरू असल्याचेही गडकरींनी सांगितले. ते नाशिक येथे एका महामार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यानंतर आता, गडकरींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले असून लोक त्यावर गमतीशीर कमेंट्सदेखील करत आहेत. (BJP leader Nitin Gadkari said a law will be made for the sound of musical instrument in the horn of the car users gave funny reactions)
गडकरी म्हणाले, "मी सध्या यावर विचार करत आहे. यासाठी कायदा तयार करण्याची योजना आखत आहे. कोणत्याही वाहनांमध्ये हॉर्न ऐवजी भारतीय इन्स्ट्रुमेंटचा आवाज येईल. बासरी, वॉयलिन, हार्मोनियम, तबला अशांचा आवाज कानासाठीही चांगला वाटेल," असेही ते म्हणाले.
गडकरींचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, लोक देतायत गमतीशीर रिअॅक्शन्स -हॉर्नच्या आवाजासंदर्भातील गडकरींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोक आपली क्रिएटिव्हिटी दाखवत गमतीशीर रिअॅक्शन्स देत आहेत. सोशल मीडियावर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि जोक्सच्या माध्यमाने रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहा काही खास आणि गमतीशीर रिअॅक्शन्स....
सोशल मीडिया युझर्सच्या रिअॅक्शन्स... -