मुंबई - माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. यापूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्यावर्षी मार्च महिन्यात पंकजा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते. (Pankaja Munde second time Corona Positive)
यासंदर्भात, स्वतः पंकजा मुंडे यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आधीच सावधगिरी बाळगत आयसोलेट झाले आहे. मी अनेक लोकांना भेटले आणि कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही मी भेटले. तेथूनच मला पुन्हा कोरोनाची लागण झाली असावी. जे माझ्यासोबत होते त्यांनी कृपया आपापली चाचणी करून घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, अशा आशयाचे ट्विट पंकजा यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. यातच नेते मंडळी बड्या-बड्या विवाहसोहळ्यांना आणि राजकीय कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहेत. राज्यात आतापर्यंत डझनावर नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनाही एका राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्यातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पंकजा मुंडे भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहणासाठी धमधम येथे होत्या उपस्थित -गेल्या चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी त्या धमधम येथे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांसोबतच व्यासपीठावरच जेवणही केलं आणि अनेकांनी त्यांना भेटून फोटोही काढले.
भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे...
ऐन कोरोना काळात भगवानबाबा मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमासाठी जमलेला जनसमुदाय...
भगवानबाबा मंदिराचा कलशारोहणासाठी पंकजा हेलिकॉप्टरने पोहोचल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले होते...
या नेत्यांना कोरोनाची लागण -माजी मंत्री दिपक सावंतशिक्षण मंत्री वर्षा गायकवाडखासदार सुप्रिया सुळेमहसूलमंत्री बाळासाहेब थोरातमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूरआदिवासी मंत्री के. सी. पाडवी आमदार सागर मेघेआमदार राधाकृष्ण विखे पाटीलऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेआमदार इंद्रनील नाईकआमदार शेखर निकमआमदार माधुरी मिसाळमाजी मंत्री हर्षवर्धन पाटीलआमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)