अजित पवारांचा स्नेह केवळ सत्तेशी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:35 PM2021-02-12T12:35:24+5:302021-02-12T12:40:01+5:30

राज्यपालांनी विमानातून उतरवणे हा पोरखेळ असून, हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी कागदपत्रे गेली होती. मात्र, त्यांनी बाजूला ठेवली, असा दावा प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी यावेळी बोलताना केला. 

bjp leader pravin darekar criticised ajit pawar | अजित पवारांचा स्नेह केवळ सत्तेशी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

अजित पवारांचा स्नेह केवळ सत्तेशी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील अनेकविध मुद्द्यांवरून प्रवीण दरेकरांची सरकारवर टीकाप्रवीण दरेकर यांनी केली गोपीचंद पडळकर यांची पाठराखण राज्यपालांनी विमानातून उतरवणे हा पोरखेळ - प्रवीण दरेकर

पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा स्नेह केवळ सत्तेशी आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर आज (शुक्रवार) पंढरपूर दौऱ्यावर असून, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (bjp leader pravin darekar criticised ajit pawar)

राज्यपालांनी विमानातून उतरवणे हा पोरखेळ असून, हा घटनात्मक पदाचा अवमान आहे. कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी कागदपत्रे गेली होती. मात्र, त्यांनी बाजूला ठेवली, असा दावा प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी यावेळी बोलताना केला. 

अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत

कोणत्याही पक्षाचा नेता असो, चुकीची भाषा वापरली जाता कामा नये. कार्तकर्त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. खालच्या स्तरावर टीका होऊनही आम्ही कुणाला मारहाण केली नाही. यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देत, फडणवीस दाम्पत्यावर अश्लील भाषेत टीका केली जातेय, त्याचे काय?, असा रोकडा सवाल प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. 

श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल

दरेकरांनी केली पडळकरांची पाठराखण

अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचे उद्घाटन रखडले म्हणून गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटन केले. पडळकरांच्या भावना समजून घ्या. यापूर्वीही अनेक उद्घाटने झाली. पण गुन्हे दाखल झाले नाहीत, अशी पाठराखण प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी केली. 

दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेकविध प्रश्नांवर भाष्य करत उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे उमदेवार निवडून यावेत म्हणून निर्णय बदलले आहेत. राज्यातील सरपंचच्या आरक्षणाची सोडत चुकीची आहे, असे प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: bjp leader pravin darekar criticised ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.