मुंबई : सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण राज्यातील प्रकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले जात आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. (bjp leader pravin darekar slams thackeray govt over param bir singh letter and sachin vaze case)
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचवावा. केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून नाही. तर, राज्यात सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.
सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार
सत्तेत राहण्याची नैतिकता सरकारला नाही
गृहमंत्रीच १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट देत असतील, तर सत्तेत राहण्याची नैतिकताच सरकारला नाही. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवार उडालेला आहे. कुणीही सुरक्षित नाही, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राष्ट्रपती या सर्व गोष्टींचा आढावा घेत असतात व घटनेने दिलेल्या सर्व गोष्टी ते करत असतात, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा
तीन पक्षाचे सरकार टिकवायचे हा एकमेव अजेंडा
महाविकास आघाडीचे सरकार भांबावलेले आहे. राज्यात शेतकऱ्याचं काय सुरू आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, पोलीस विभागात काय सुरू आहे. कोरोना रूग्ण आजही वाढत आहेत. केवळ आमच्या तीन पक्षांचा समन्वय राहिला पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. या भोवतीच हे सरकार फिरताना दिसते आहे. कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाहीत, केवळ तीन पक्षाचे सरकार कसे टिकवायचे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.