शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 6:46 PM

रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Ranjeetsing Mohite Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असलेले भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यामुळेच त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजते. मात्र आमदारकीच्या राजीनाम्याबद्दल स्वत: रणजीतसिंह मोहिते पाटलांनी अद्याप अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मात्र विजयसिंह मोहितेंचे पुत्र रणजीतसिंह मोहिते हे अद्यापही भाजपमध्येच होते. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीपासून ते भाजपच्या व्यासपीठावर जाणं टाळत होते. त्यामुळे ते लवकरच भाजपला रामराम करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आता त्यांनी आपला राजकीय निर्णय घेत आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

माढा विधानसभेत तिकिटाचा तिढा

माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तब्बल सहा नेते इच्छुक असल्याचे समजते. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील यांचा समावेश आहे. यातील अभिजीत पाटील, संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील अशा चौघांनी आज शरद पवारांची भेट घेतली. "आम्ही सर्व इच्छुक भेटल्यानंतर रणजीत शिंदे यांना आपण उमेदवारी देणार नसल्याचं शरद पवारांनी आम्हाला आश्वास्त केलं आहे," अशी माहिती या इच्छुकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmadha-acमाढाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024