शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

"उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?; ते तर आता, पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 6:02 PM

5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर, उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातच आता भाजपा नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? असा सवाल करत, ते आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत, अशी बोचरी टीकाही रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवर केली. ते झी 24 तासशी बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, “निमंत्रण आले नाही तरी, राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवे तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येला जावे. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत”. एवढेच नाही, तर उद्धव ठाकरे हे सर्व पातळ्यांवर नापास झाले आहेत. हे नापासांचेच सरकार आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

 उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील -तत्पूर्वी, "उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील. शिवसेनेचे या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नाते जोडले आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे, त्यातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेनेने मोठे योगदान दिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर, म्हणजे सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यावरही तेथे गेले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच देशाच्या आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने भूमिपूजनाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोरोनाचे संकट नसते तर लाखो रामभक्त तेथे आले असते. पण कोरोनामुळे निमंत्रण देण्यावर बंधनं आहेत. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 150 लोकांनाचा या कार्यक्रमासाठी बोलावण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असे काहींना वाटते, असे ते म्हणाले होते. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झाले आहे, कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने, असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे, कोरोना भूमीपुजनावर उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र