ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबईसह दहा महापालिकांसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरूवात झाली असून राज्यभरात मतदानाला मध्यम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपा नेत्या शायना एनसी यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे मतदानासाठी त्या चक्क सायकलवरून आल्या होत्या. शायना यांनी मंगळवारी सकाळी नेपिअन्सी रोडवरील मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवले.
मतदार यादीत नाव न मिळाल्याने त्यांना प्रथम मतदान करता आले नाही मात्र काही अधिका-यांनी सहाय्य केल्यानंतर त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला.
दरम्या आज सकाळपासून बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक राजकीय नेत्यांनीही मतदान केले असून त्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, मनसे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार, विनोद तावडे यांचाही समावेश आहे. सर्वांनीच मतदानाचा अधिकार बजावतानाच नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.
Mumbai: Shaina NC arrived to cast her vote at Napansea Rd polling booth on a cycle;could not find her name in the voter's list #BMCelectionpic.twitter.com/iUm5G0X0AA— ANI (@ANI_news) February 21, 2017
Mumbai: BJP's Shaina NC was able to cast her vote later after the authorities helped her with the formalities. pic.twitter.com/lw8KlfAGsK— ANI (@ANI_news) February 21, 2017