शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

By जयदीप दाभोळकर | Published: January 03, 2021 11:26 AM

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाही न करता केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती, दरेकरांचा आरोपयापूर्वी काँग्रेसनंही केला होता नामांतराला विरोध

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राजकीय कलगितुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी संभाजीनगर या नामांतराला विरोध केला होता. आता यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे. कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा," असं दरेकर म्हणाले.  "राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस आणि एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कोणतीही गोष्ट असली की केंद्राकडे बोट दाखवलं जात मग तुम्ही राज्य सरकार का चालवता?," असा सवालही त्यांनी केला. महाकाली लेणीसंदर्भात निर्णय घेताना केंद्राला विचारणा केली होती का? आमच्या अस्मितेशी निगडीत कोणताही विषय केंद्र सरकारकडे अडकणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी राहू परंतु नाचता येईना, अंगण वाकडं, अशी त्यांची गत झाल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.सत्तेला अधिक महत्त्व"बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहिली. काहीही झालं तरी चालेलं. प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर असं नामांतर करू असं म्हटलं होतं. परंतु आता आहे का हिंम्मत? आता त्यांना सत्ता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं लक्ष अधिक काळ विचलित करता येणार नाही," असंही दरेकर म्हणाले. राज्य सरकारनं मंत्रिमंडळात नामांतराचा निर्णय घ्यावा आणि सरकार म्हणून शिफारस करावी. आम्ही केंद्राला मदत करण्यास सांगू. परंतु असं काही करायचं नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती आहे. हे न समजण्याइतकी राज्यातील जनता दुधखुळी नसल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकर