मुंबई - राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली. "माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी, कोरोना टेस्ट करावी आणि क्वारंटाईन व्हावे, अशी मी विनंती करतो," असे मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही दोन दिवसांतच आटोपते घेण्यात आले होते. मात्र, या अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाचा धोका वाढला आहे. सुधीर मुनगंटीवारांपूर्वी, आजच अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय त्यांची पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ -देशात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवे 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 297480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22 टक्के झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.
कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा कोरोना अहवालही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी