उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा; काँग्रेसला लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 06:22 PM2023-09-24T18:22:13+5:302023-09-24T18:26:52+5:30

Nagpur Flood: उद्धव ठाकरे, काँग्रेसने विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले. जनतेने नाकारल्याने तुम्हाला दुसरा कामधंदाही उरला नाही. लगे रहो!, असा पलटवार भाजपने केला.

bjp maharashtra replied maharashtra congress over criticism on dcm devendra fadnavis about nagpur flood | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा; काँग्रेसला लगावला टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा; काँग्रेसला लगावला टोला

googlenewsNext

Nagpur Flood: शुक्रवारी मध्यरात्री शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती नंतर झालेल्या नुकसानाची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला व  माहिती जाणून घेतली. यावेळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून काँग्रेसने भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे पाहणी करत असताना, अनेक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत होते. याचा एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस एक कार्यकर्त्याचा हात ओढून त्याला समोर आणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर करत भाजपवर टीका केली. पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार? या शब्दांत हल्लाबोल केला. यावर भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून खुलासा केला.  

चल बाबा तुझ्याही घरी येतो

काँग्रेसने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यापुढे काय झाले, हे सांगणारा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा!, असे भाजपने म्हटले आहे. कार्यकर्त्याच्या घरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केल्याचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. 

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो...!, या शब्दांत भाजपने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. 

 

Web Title: bjp maharashtra replied maharashtra congress over criticism on dcm devendra fadnavis about nagpur flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.