पुणे: काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार गर्दी न करण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले जात आहे. पण, त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्या या नियमांना केराटी टोपली दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन भाजप आमदाराने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शनिवारी खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. ट्विटरवर संजय राऊत यांच्या मेळाव्याचे फोटो शेअर करत अतुल भातखळकर म्हणले की,'अग्रलेख हे ज्ञान पाजळण्यासाठी, सल्ले देण्यासाठी, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असतात. गर्दीमुळे सर्वसामान्य जनतेला कोरोना होतो. पुण्यातील कार्यक्रमात उसळलेली ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं,' असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून वारंवार आव्हानवाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार गर्दी न करण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले जात आहे. पण, त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्या या नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी कोरोनाच्या भयाण संकटात गर्दी जमवून मिरवणूक काढल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी खेडच्या मेळाव्यात मोठी गर्दी जमवली. यावरुन नेत्यांनाच कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे.