अमरावती - ही सभा होईपर्यंत फार मस्ती सुरू होती. नितेश राणेला अचलपूरला येऊ देणार नाही. परतवाडा इथं सभा घेऊ देणार नाही असं बोलत होते पण एक लक्षात ठेवा, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे तुमच्या अब्बाचं पाकिस्तान नाही. हिंदू समाज फ्लॉवर नही, फायर है...सभा आयोजित केल्यानंतर फार हिरवे साप वळवळत होते. कुठे गेले ते १५ मिनिटवाले...अशा शब्दात भाजपा नेते नितेश राणे यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला आहे.
अमरावतीत सकल हिंदू समाजाकडून रॅली आणि धर्मसभेचं आयोजन केले होते. या सभेत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषण केले. नितेश राणे म्हणाले की, हैदराबादच्या त्या XXX बोलवा, आम्ही इथं परतवाड्यात आहोत सांगा. १५ मिनिटे खूप झाली, ५ मिनिटांत उरलेसुरले संपवू. तुम्ही कुणाला आव्हान देता, हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. हिंदूकडे वाकड्या नजरेने कुणी बघू नये. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. आम्ही तुम्हाला छेडलं नाही. तुम्ही पाहिजे ते कराल मग आम्ही हिंदूंच्या बाजूने बोलायचं नाही का असा सवाल नितेश राणेंनी केला.
तसेच आम्हाला महाराष्ट्रात वातावरण खराब करायचं नाही. तुम्ही भाईचाराबाबत आम्हाला बोलता, सर्वधर्मसमभाव बोलतात मग तो नियम तुम्हाला नाही का? तुमच्यासाठी नियम वेगळे आहेत का? जो नियम इतर धर्मांना, सणांना लागतो तोच नियम गणेश मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या सणांना लागला पाहिजे हे आमचे स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल, धिंगाणा घालाल. रात्री २ वाजेपर्यंत डिजे वाजवाल परंतु हिंदू समाज रस्त्यावर उतरून जल्लोष करतो तेव्हा तुम्हाला मिरच्या का झोंबतात अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
दरम्यान, माझ्यावर दंगलीचे आरोप करता परंतु नुकतेच गणेश मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी ईदची रॅली निघाली. या देशात आणि महाराष्ट्रात ईदच्या रॅलीवर हिंदू समाजाने कुठेही दगडफेक केली नाही. कुठेही गोंधळ केल्याचं एकतरी उदाहरण द्या. मात्र आमच्या मिरवणुकीवेळी प्रत्येक वेळी दगडफेक झालीय मग आम्ही कुणीही बोलायचे नाही. आम्ही घरी गप्प बसायचे? आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा देशात सर्वधर्मसमभाव आहे, भाईचारा आहे असं सांगितले जाते. हा कुठला न्याय आहे असं नितेश राणेंनी विचारले.