मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन सुरू झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते नितीश राणे(Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांचा 2017 मधील वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत अब्दुल सत्तार यांनी भगवान हनुमानाचे नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करताना दिसत आहेत. नितेश राणेंनी या व्हिडिओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून, सत्तारांच्या अटकेची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना आव्हाननितेश राणेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवर 'शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करताना. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना...मग सत्तारांना तुरुंगात डांबून दाखवा,' असे आव्हान केले आहे. यावर अद्याप अब्दुल सत्तारांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.