शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Mohit Kamboj On Sanjay Raut : संजय राऊत माझे पैसे परत करा!; मोहित कंबोज यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 2:30 PM

संजय राऊत यांनी सेनाभवनातील पत्रकार परिषदेत वापरलेल्या शब्दांचं आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे समर्थन करतात का?, कंबोज यांचा सवाल

Mohit Kamboj On Sanjay Raut : "राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ," अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी अखेरिस भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या नावाचाही उल्लेख करत ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फ्रन्टमॅन असल्याचंही म्हटलं. तसंच आपण त्यांना ओळखत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर मोहित कंबोज यांनी राऊत यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्याकडून २५ लाख रूपयांची मदत घेतल्याचा दावा त्यांनी केला. 

आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी ट्वीट करत "संजय राऊत पैसे परत करा," अशी मागणी केली आहे. "माझा आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना एक विनम्रतेने प्रश्न आहे. संजय राऊत यांनी सेनाभवनात एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे शब्द वापरले, आदित्य ठाकरे आज जे तरुण पिढीची गोष्ट करतात, सुप्रिया सुळे ज्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेबाबत बोलतात या शब्दांचं ते समर्थन करतात की नाही?," असा सवाल कंबोज यांनी केला. "दुतोंडी राजकारण आता नाही चालणार. जर तुम्ही याचं समर्थन करत असाल तर समर्थनाबाबत सांगा अन्यथा समर्थन करत नसाल तर त्याबाबत सांगा. सेनाभवनात बसून जर आज राऊत स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलना करू पाहत असतील राऊतांनी हे समजावं की तुम्ही त्यांच्या पायाची धुळही नाही. बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट आणि प्रत्येकाच्या हृदयात त्यांचा मान आहे. तुम्ही त्यांना कॉपी करण्याचा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात अमर आहेत. आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी ते राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का हे स्पष्ट करावं," असंही ते म्हणाले.

यापूर्वी काय म्हणाले होते कंबोज?यापूर्वी राऊत यांच्या वक्तव्यावर कंबोज यांनी प्रत्युत्तरही दिलं होतं. "संजय राऊत हे मला ओळखत नाहीत असं म्हणतात. तरीही दरवर्षी गणेशोत्सवात माझ्या घरी येतात. अनेकदा मी गरज भासल्यास त्यांना पैसेही दिले आहेत," असे मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, संजय राऊत यांचा स्वत:च्या घरात सत्कार करतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला होता. अनोळखी माणसाकडून संजय राऊत यांनी २५ लाख रुपये मदत घेतली. २०१४ मध्ये रॉयल मराठा एंटरटेनमेंट कंपनीच्या नावाने हे पैसे घेतले आहेत. आता, तुमचं सत्य सगळ्यांना सांगणार, पूर्णपणे बेईज्जत करणार संजय राऊत तुम्हाला... अशा शब्दात मोहित कंबोज यांनी ट्वीट करुन राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAditya Thackreyआदित्य ठाकरेSupriya Suleसुप्रिया सुळेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे