BJP MP Ashok Chavan News: सात, दस साल से, वो मेरेको पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं, अशी भन्नाट डायलॉगबाजी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना थेट राज्यसभा खासदारकी देण्यात आली. यानंतर अशोक चव्हाण यांचे नाव आता भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीत जाहीर केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण सक्रीयपणे प्रचारसभा घेताना, बैठका घेताना दिसत आहेत. भाजपाचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच अलीकडेच नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले.
डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नही है
भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नही है, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विकासाचे काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो. एकदा मनात आणले की करून दाखवतो, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातही दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो, असे अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.