शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जयसिद्धेश्वर महास्वामी हायकोर्टात; मूळ दाखला हरवल्याची पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 3:28 AM

जात दाखला अवैध प्रकरण; पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता

मुंबई : जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला जयसिद्धेश्वर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. समितीचा निर्णय रद्दबातल ठरवावा, अशी मागणी महास्वामींनी केली आहे.जात पडताळणी समितीने पक्षपातीपणा करून तक्रारदारांचे म्हणणे ऐकले. आपण सादर केलेले पुरावे गृहीत धरले नाहीत. आपली बाजू ऐकली नाही. समितीने नैसर्गिक न्यायदान तत्त्वाला बगल देत मनमानीपणे निर्णय दिला.त्यामुळे आपले जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा समितीचा निर्णय रद्द करावा व समितीच्या आदेशानुसार आपल्यावर कोणतीही फौजदारी व दिवाणी स्वरूपाची कारवाई करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी महास्वामी यांनी याचिकेद्वारे केली आहे. अ‍ॅड. संतोष न्हावकर यांच्याद्वारे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.आपले मूळ जातप्रमाणपत्र हरविले. याबाबत १४ जानेवारी २० रोजी वळसंग पोलिसांकडे तक्रार केली आणि नेमकी १५ फेब्रुवारी रोजी समितीपुढे याबाबत सुनावणी होती. जातीचा दाखला हरवल्याचे समितीला सांगितल्यावर त्यांनी संबंधित दाखला खोटा असल्याचे निरीक्षण नोंदविले. मुळात, समितीपुढे मूळ दाखला नेण्याची आवश्यकता नाही.समितीने अन्य पुरावे सादर करण्याची संधी न देता केवळ तक्रारदारांच्या दबावामुळे व त्यांनी तोंडी जे आरोप केले त्यावर विश्वास ठेवून आपला जातीचा दाखला अवैध ठरवला, असे महास्वामी यांनी याचिकेत म्हटले आहे.खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत १९८२ सालचा बेडा जंगम जातीचा दाखला निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे व विनायक कुंडकुरे यांनी सोलापूर जात पडताळणी समितीकडे केली.त्यावर १५ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पाडली आणि २४ फेब्रुवारी रोजी जात पडताळणी समितीने महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिला.या निर्णयाला महास्वामी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावर न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.निवडणूक आयोगाला अहवालसोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे बेडा जंगम जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक आयोगाला पाठविला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने खासदारांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवितानाच अक्कलकोट तहसील कार्यालयातून हे प्रमाणपत्र वितरित करणारे कर्मचारी व खासदारांविरूद्ध न्यायालयात फिर्याद देण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अक्कलकोट तहसीलमधून हे प्रमाणपत्र वितरित होताना १५ जानेवारी १९८२ मध्ये कोण कोण कार्यरत होते याचा शोध महसूल खात्यामार्फत सुरू झाला आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट