सत्तारांच्या बंडावरुन भाजपा खासदार नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:04 PM2020-01-04T17:04:35+5:302020-01-04T17:07:03+5:30
महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही
सोलापूर - सरकार स्थापन करुन महिना झाला तरी खातेवाटप नाही, दालन आणि बंगले घेतले पण कारभार सुरु नाही, खातेवाटप न होता मंत्र्यानी राजीनामा दिला ही सुरुवात आहे. घरातच कॅबिनेट मंत्रिपद घेतले, मुख्यमंत्रिपद घेतले आणि सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या बाहेर ठेवलं. जनतेच्या कोणत्या प्रश्नाची देणघेणं नाही अशी घणाघाती टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार २ महिनेही टिकेल याची खात्री नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोणताही अभ्यास नाही, वचक नाही, कोणतंही काम नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. कर्जमाफीचा जीआर काढला त्यावर कधीपासून अंमलबजावणी करणार याचा उल्लेख नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच तीन पक्ष एकत्र येणं चुकीचं. विचाराधारा वेगळ्या असताना सत्तेसाठी एकत्र आलेत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र आले नाहीत. मलाईदार खात्यासाठी वाद आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकारमध्ये अस्तित्व नाही. मुख्यमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारला तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातांकडे बघतात असा टोलाही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही; खोतकरांचा दावा, उद्या घेणार उद्धव ठाकरेंची भेट
आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेस आमदार गोरंट्यालही राजीनाम्याच्या तयारीत
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस उलटले नाही तोवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नाराजांना पेव फुटणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्यालही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराज असल्याचं समोर आलं आहे. तर आज अशा अनेक बातम्या येतील असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका
आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा
तर एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.
...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...