शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सांगली जिल्ह्यात भाजपाची मुसंडी

By admin | Published: February 24, 2017 4:36 AM

जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपाने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट

सांगली : जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपाने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट सत्तेपर्यंत मजल मारली. ६० पैकी २५ जागा मिळवून भाजपा जिल्हा परिषदेतील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी समविचारी रयत विकास आघाडी आणि शिवसेनेला सोबत घेऊन ते सत्ता स्थापन करू शकतात. राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत भाजपाने मोठे यश मिळविले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे जागांचे गणित फिस्कटले, तर पक्षांतर्गत गटबाजी आणि फाजिल आत्मविश्वासाचा फटका काँग्रेसला बसला. काँग्र्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांना पलूस-कडेगाव या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात, तर भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांना स्वत:च्या तासगाव तालुक्यात जबर दणका बसला. बालेकिल्ला असलेल्या  मिरज तालुक्यातही काँग्रेसची वाताहत झाली  आहे. वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ या  तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे  यश मिळाले, मात्र त्यांचे सत्तेचे स्वप्न भंगले. आजवर एकदाच एकच जागा जिंकलेल्या शिवसेनेला यंदा आ. अनिल बाबर यांच्या माध्यमातून तीन जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेनेचे बळ वाढले आहे. सांगलीपक्षजागाभाजपा२५राष्ट्रवादी१४काँग्रेस१०शिवसेना०३इतर०८