Ashish Shelar vs Nana Patole: "काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:49 PM2022-12-03T20:49:29+5:302022-12-03T20:50:59+5:30
भाजपाच्या आशिष शेलारांनी दिला इशारा, शिवसेनेलाही लगावला टोला
Ashish Shelar vs Nana Patole: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक विषय गाजत आहेत. नुकतेच अजय आशर यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचे दिसले. "केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नीती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच 'मित्र'ची स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली आहे. हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर, "नाना पटोले काय डोक्यावर पडलेत का?" असा संतप्त सवाल आशिष शेलारांनी केला.
"महाविकास आघाडीला त्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता. तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. तत्कालीन प्रश्नावर आजही ठाम आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना क्लीन चिट का दिली? डोक्यावर पडल्यासारखे काँग्रेसने प्रश्न विचारू नये. जुन्या व्हिडिओ क्लिपवर प्रश्न विचारायचे असतील, तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठल्या भागाला लकवा लागला होता याचाही व्हिडिओ काढेन. काँग्रेसने शिवसेनेला हा वाघ नाही मांजर आहे असं म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे. जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल," असा इशाराच आशिष शेलारांनी दिला.
दरम्यान, सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. मुंबईकरांचा आणि विशेषता भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे. अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.