शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:31 PM

पक्षांतरांच्या चर्चेला पंकजा मुंडेंकडून पूर्णविराम; राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर हल्लाबोल

बीड: भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून काहीशा दूर गेल्याचं चित्र दिसत होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येनं गोपीनाथ गडावर जमण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असं म्हणत मुंडेंनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडेंच्या कामाची आठवण करुन देत त्यांनी भाजपातील राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तो पक्ष आपण रिव्हर्स गिअरमध्ये नेऊ नये एवढीच विनंती. मला तो पक्ष परत पाहिजे, असं पंकजा म्हणाल्या.पक्ष ही प्रक्रिया असते. त्यावर कुणाचीही मालकी नसते. पक्ष एका व्यक्तीचा नाही. अटल बिहारी वाजपेयी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी भाजपाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही, असं म्हणत त्यांनी पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गोपीनाथ गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहन केलं. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतंय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं पंकजा म्हणाल्या. पद मिळवण्यासाठी मी दबावतंत्र वापरते. पदाच्या हव्यासापोटी असे आरोप होत असतील, तर मला कोअर कमिटीतून मुक्त करा. लोकशाही मार्गानं तिथं (कोअर कमिटीत) काही होत नसेल, तर त्या ठिकाणी राहण्यात अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडे