शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
2
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
4
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
5
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
6
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
7
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
8
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
9
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
10
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
11
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
12
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
13
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
14
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
15
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
16
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
17
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
18
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

Narayan Rane: पैसा खाणे शिवसेनेचा धर्म, शिवसैनिकांना दमडी तरी मिळाली का?; नारायण राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:54 PM

तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? असा सवाल नारायण राणेंनी केला.

मुंबई – महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या(Yashwant Jadhav) डायरीत कुणाकुणाची नावे आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी जे पैसे खाल्ले ते मुंबईच्या जनतेने जो कर भरला आहे. त्यातून १५ टक्के कंत्राटातून काढले ते आहेत.  मुंबईकरांच्या मेहनतीचा पैसा यशवंत जाधवांनी खाल्ला. यावर कुणीच बोलत नाही. पक्षप्रमुख पण नाही आणि शिवसेनाही नाही. बेकायदेशीरपणे केलेल्या कामाचं समर्थन शिवसेना कसं करते हे लोकं पाहत आहेत. पैसा खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर केला.

नारायण राणे(Narayan Rane) पत्रकार परिषदेत म्हणाले की, ईडीची धाड पडली तर तो पैसा कुठून आला त्याची माहिती दे. अधिकाऱ्यांकडे खुलासा कर. वकील घेऊन जा, पण सूडाची कारवाई वैगेरे बोलत बसलात. पीएमएलए कायदा त्यासाठीच आहे. शिवसेना कुणाला घाबरणार नाही. तुमच्या काळ्या पैशाचा शिवसैनिकांचा संबंध कसा आला? कोट्यवधीचे घोटाळे तुम्ही करणार त्यातील शिवसैनिकांना एक दमडी तरी मिळाली का? एका जाधवांकडे इतका कोट्यवधीचा पैसा मिळाला तर बाकींच्याकडे किती असतील? महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नावं सीबीआयकडे देणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच कोरोनाकाळात अनेक शिवसैनिक गेले. त्यांचे घरसंसार उघड्यावर पडले. मुख्यमंत्री एकाच्या तरी घरी गेले का? रमेश मोरेला कोणी मारलं? पोलीस कर्तबगार आहे. तुमच्याकडे सरकार आहे. चौकशी करा. शिवसेना वाढण्यासाठी दिवसरात्र घालवली त्यांच्यासाठी पक्षाने काय केले. लोकप्रभामध्ये असताना ठाकरे कुटुंबावर कपडे उतरवण्याची भाषा संजय राऊतांनीच केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आहे की संजय राऊत हा लोकांना प्रश्न पडला आहे असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

बिनमुख्यमंत्र्यांचं राज्य

महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुली तूट २४ हजार कोटींची आहे. अर्थसंकल्पात केवळ हे देऊ, ते देऊ अशी बनवाबनवी केली. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. या राज्याला मुख्यमंत्री नाही. बिनमुख्यमंत्र्यांचे राज्य आहे. मंत्रालयात कुणी नाही. कॅबिनेटला नाही. सभागृहात तोंड दाखवायचं आणि जायचं. अंतिम आठवडा प्रस्तावात सभागृहात राजकीय भाषण केले. वैचारिक विचार काहीच दिला नाही. राज्याच्या जनतेला काय उत्तर दिले. भाषणात टोमणेच दिले असंही नारायण राणे म्हणाले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे