मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडताना दिसत आहेत. एकीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर यातून मार्ग कसा काढता येईल, याची चाचपणी राज्यातील ठाकरे सरकार करताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले. यावरून भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत, ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असे म्हटले आहे. (bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation)
नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. संध्याकाळी ५ वाजता चहाचा वेळ असतो. मुख्यमंत्री चहासाठी राज्यपालांकडे गेले होते. इतरांनाही सोबत चला असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही. ते काही वाचतही नाहीत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.
मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका
मराठा समाजाने एकत्र येणे गरजेच
मराठा समाजाने एकत्र येणे गरजेच आहे. आरक्षणासाठी मराठा समजाने विचार करावा. सरकार आरक्षण देण्यात कमी पडले आहे. ते सध्या नेतृत्त्व करत असतील तर त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडावी. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यपालांना निवदेन देण्याची घाई का केली, अशी विचारणा करत त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व मराठा संघटनांचे नेते, तज्ज्ञांना बोलवा. विचार विनिमय करा, चर्चा करुन पुढल्या भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असेही राणे म्हणाले.
“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”
मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही
ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपले मंत्रिपद टिकवण्यात रस आहे. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे हे या सरकारच्या मनात नाही, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तसेच घटनेत बसणारे योग्य आरक्षण भाजप सरकारने दिले. पण या तीन पक्षाच्या सरकारने बाजू मांडली नाही. इतर राज्यांना आरक्षण देणे जमते, मग महाराष्ट्र सरकारला का नाही जमले, असा थेट सवाल यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.