शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

भाजपा-राष्ट्रवादीचा दोस्ताना!

By admin | Published: March 12, 2015 1:38 AM

जातीयवादी पक्ष अशा शब्दात भाजपाची संभावना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील

मुंबई : जातीयवादी पक्ष अशा शब्दात भाजपाची संभावना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी भाजपाशी दोस्ती केली असून ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. सभापतींविरुद्धचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता ४० मतांची गरज असून तेवढी मते राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापकडे नसल्याने भाजपा या ठरावाला पाठिंबा देईल, असे भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्या ‘मैत्री’चा नवा अध्याय १७ मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे.भाजपा या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. सभापतीपद राष्ट्रवादीकडे गेल्यावर कदाचित उपसभापतीपदाची मागणीही भाजपाकडून केली जाणार नाही, असेही या मंत्र्याने सूचित केले. तसे झाल्यास विधान परिषदेतील सभापती, उपसभापती व विरोधी पक्षनेता ही तिन्ही पदे राष्ट्रवादीकडे येतील. वरील सभागृहात राष्ट्रवादीची मक्तेदारी निर्माण होऊ नये असा विचार भाजपाने केला तर उपसभापतीपदावर भाजपा दावा करील. तसे झाल्यास सभापतीपदी रामराजे निंबाळकर आणि उपसभापतीपदी फुंडकर यांना संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची अनुमती मागितली. हा प्रस्ताव मांडण्याकरिता दहा सदस्यांनी सभागृहात उभे राहण्याची गरज होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ व शेकापचे जयंत पाटील सभागृहात उभे राहिले. विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी शिरगणती केल्यावर २४ सदस्यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. नियमानुसार पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या पुरेशी असल्याने आता हा प्रस्ताव १७ मार्च २०१५ पर्यंत विचारात घेण्यात येईल, असे उपसभापती डावखरे यांनी सांगितले.पुढील किमान दोन दिवस हा प्रस्ताव चर्चेला घेऊ नका, अशी मागणी काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केली तर हा प्रस्ताव कधी घेणार ते सायंकाळपर्यंत जाहीर करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर आपण निर्णय घेऊ व सर्व संबंधितांना कळवू, असे डावखरे यांनी सांगितले.आता उपसभापती सभागृह नेते, विरोधी पक्षनेते व गटनेते यांची बैठक बोलावून अविश्वास प्रस्ताव चर्चेला कधी घ्यायचा त्याची तारीख जाहीर करतील. अविश्वास प्रस्तावावर सदस्यांची भाषणे होतील. खुद्द सभापती देशमुख यांना आपले मत व्यक्त करायचे असेल तर करता येईल. त्यानंतर ठराव मताला टाकण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)