ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 13 - महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. मुंबईनंतर आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवडात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी-भाजपावर घणाघाती टीका करत मोदी-पवारही भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले भाजपा ही राष्ट्रवादीची बी टीम आहे. एकमेकांवर टीका करणारे राष्ट्रवादी-भाजप निर्लज्जतेचं उदाहरण आहे असे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाबरोबरची युती का तोडली? याचा खुलासाही केला. ते म्हणाले अर्धी कॉंग्रेस-राष्ट्रवादी भाजपमध्ये गेली आहे. मोदी-पवार एकाच कार्डाच्या दोन बाजू आहेत. मनात काळं असलेले लोक शिवसेनेबरोबर नको. संयम किती काळ पाहायचा, दोन वर्ष संयम पाहिला' मग मीच युती तोडली. एक घाव, दोन तुकडे असे म्हणत त्यांनी आपली तोफ डागली.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे - - महापालिकेची निवडणूक असूनही तिथं मोदींचा फोटो' गोव्यातही तेच, म्हणून त्यांच्यावर टीका- भाजपचे 10 अब्ज सदस्य आहेत म्हणे, परग्रहावरचे असतील- तुम्ही आमची कुंडली काय काढणार? 'तुमची कुंडली अधिक काळी, ती आम्ही काढू- फडणवीस सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार असेल...' ...तर आमचा कायमचा पाठिंबा असेल- भाजपही राष्ट्रवादीची बी टीम- मोदी-पवार एकाच कार्डाच्या दोन बाजू- एकमेकांवर टीका करणारे राष्ट्रवादी-भाजप निर्लज्जतेचं उदाहरण