राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून पेटलेला वाद अधिकच चिघळला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असं विधान केल्याने, त्यांच्यावरही टीका होत आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांना एक पत्र लिहिलं आहे. तसेच शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आपण औरंगजेबाबाबत ”औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?“ असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे! कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही" असं म्हटलं आहे.
"आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही"
"काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषित करतो. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय."
"औरंगजेबाने तोडलेली हिंदू मंदिरं
सोमनाथ मंदीरकृष्ण जन्मभूमी मंदीरकाशी विश्वनाथ मंदीर विशश्वेर मंदीर गोविंददेव मंदीरविजय मंदीरभीमादेवी मंदीरमदन मोहन मंदीरचौंषष्ठ योगिनी मंदीरएलोरो मंदीरत्र्यंबकेश्वर मंदीरनरसिंगपूर मंदीरपंढरपूर मंदीर" असं नितेश राणे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"