तीन दिवस मुदत : निलंबनाची साशंकतामुंबई : एका स्टिंग आॅपरेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांबद्दल वादग्रस्त विधाने करण्याचा आरोप असलेले आमदार राज पुरोहित यांना प्रदेश भाजपाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.विविध चॅनेल्सवर दाखविण्यात येत असलेल्या सीडीमध्ये आपण पक्ष व पक्षाच्या नेत्यांसंबंधी काही आक्षेपार्ह विधाने केलेली दिसत आहेत. आपली ही कृती पक्षाची शिस्तभंग करणारी आहे. या संदर्भात आपण तीन दिवसांच्या आत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे खुलासा करावा, असे नोटिशीत म्हटले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने ही नोटीस काढण्यात आली आहे. भाजपा नेतृत्व पुरोहित यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे पक्षनेतृत्वाचे असे जाहीरपणे वाभाडे काढणाऱ्या पुरोहित यांच्यावर कारवाई झाली नाही, तर असे बोलण्याची पक्षातील इतर कोणाचीही हिंमत वाढू शकेल. त्यामुळे पुरोहित यांच्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असा सूरही पक्षात आहे. पुरोहित यांनी पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, दिवंगत नेते प्रमोद महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. मंगलप्रभात लोढा यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली असल्याचे सीडीमध्ये दिसते. त्यातील लोढा यांनी ‘पुरोहित यांच्या बिनबुडाच्या गप्पांना समजूतदार व्यक्ती महत्त्व देणार नाही. कोणत्याही राजकीय नेत्याचा आपल्या उद्योग समूहात पैसा गुंतलेला नाही. पुरोहित यांचे वक्तव्य बेताल आहे’, असे म्हटले होते. दरम्यान, त्या सीडीमधील आवाज आपला नसल्याचा पुनरुच्चार पुरोहित यांनी आज केला. ही तर नेत्यांच्या मनातील खदखदपुरोहितांच्या मनात असलेली भावनाच भाजपाच्या राज्यातील इतर नेत्यांमध्येही आहे. पक्षातील ही खदखद पुढे येत असल्याने राज्य सरकारची ंिचंताजनक परिस्थिती आहे़ राज्यातील भाजपा-सेना युती सरकार कमी कालावधीत विरोधक आणि माध्यमांना मोठे खाद्य पुरवील, असे वाटले नव्हते़- शरद पवारम्हाळगी प्रबोधिनीत बैठकभाजपामध्ये संघटन सचिव असलेल्या, पण मुळात रा. स्व. संघाचे प्रचारक असलेल्यांची एक बैठक शनिवारी उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाली. पुरोहित यांनी भाजपा नेते आणि संघाबद्दल केलेल्या विधानांबाबत या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
राज पुरोहितांना भाजपाची नोटीस
By admin | Published: June 28, 2015 3:08 AM