- यदु जोशीमुंबई : भारतीय जनता पार्टीही महात्मा गांधींच्या मार्गाने निघाली असून २ आॅक्टोबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची स्वच्छता, सेवा व संवाद पदयात्रा काढणार आहे.भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू झाली. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.२ आॅक्टोबरपासूनच्या यात्रेत स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल. एका पदयात्रेत प्रत्येकी ७५ पुरुष-महिला कार्यकर्ते,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील. १५ टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात बिरसा मुंडा जनजातीय अभियान राबविले जाईल. तर भाजपाच्या पेजप्रमुखांची संमेलने १ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान होणार आहेत.खेलो महाराष्ट्र मुख्यमंत्री चषक२८ सप्टेंबर ते १२ जानेवारी दरम्यान भाजपा युवा मोर्चातर्फे खेलो महाराष्ट्र उपक्रम राबविला जाईल. तालुका ते राज्य पातळीपर्यंत क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांचे सामने होतील. आयुष्यमान क्रिकेट, जलशिवार फुटबॉल अशी स्पर्धाची नावे असतील. अंतिम स्पर्धेला मुख्यमंत्री चषक असे नाव राहील.आणखी १ लाखसदस्य जोडणारराज्यात भाजपाचे १ कोटी ५ लाख सदस्यसंख्या असताना आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आणखी एक लाख सदस्य नोंदणी करून एकूण सदस्य संख्या दीड कोटींवर नेली जाणार आहे.भाजपाची पावले स्वबळाकडेशिवसेनेशी युतीस आम्ही तयार असल्याचे भाजपाकडून सांगितले जात असले तरी त्याचवेळी भाजपाने स्वबळाची तयारीही सुरू केली आहे.गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षात पदयात्रा काढून संवाद साधण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. गांधीजी हे राष्ट्रपिता आहेत आणि ते सगळ्यांचे आहेत. ते काही एकट्या काँग्रेसची प्रॉपर्टी नाहीत.- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री
भाजपाही आता गांधीजींच्या मार्गाने; २ ते १५ आॅक्टोबर राज्यभर पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:20 AM