विले पार्ले विधानसभेत भाजपाकडून ‘जागर मुंबईचा’ अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी आमदार, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी आणि भाजपाच्या नेत्या, खासदार पूनम महाजन उपस्थित होते. या सभेमध्ये पूनम महाजन (BJP Poonam Mahajan) यांनी राहुल गांधींवर (Congress Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. "दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही. राहुल गांधी लोकांना भ्रमित करताहेत" असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
"तुम्हाला तारक मेहता का उलटा चश्मा बघायची गरज नाही, इथंच राहुल गांधी यांचा उलटा दिमाग… पाहता येईल" असा टोलाही पूनम महाजन यांनी लगावला. तसेच राहुल गांधी यांनी नेहमीच मातेच्या मागे उभं राहून राजकारण केलं. आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहून राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरू आहे, कुठे आहे तुमचा पुरुषार्थ? असा सवाल देखील विचारला आहे. जागर मुंबईचा या मोहिमेअंतर्गत सभेत पूनम महाजन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
"दाढी वाढवल्यामुळे कोणी नरेंद्र मोदी होत नाही. त्यासाठी समर्पण आणि ताकद कमवावी लागते" असा टोला पूनम महाजन यांनी लगावला. तसेच राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून भारत भ्रमण करतायत की लोकांना भ्रमित करतायत असंही म्हटलं आहे. "स्वसमृद्धीसाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करत आहेत. ही तीच काँग्रेसची सत्ता आहे, 2007 मध्ये जेव्हा एएसआयने अभ्यास करून सुप्रीम कोर्टात रामसेतू हा ऐतिहासिक आहे, असा अहवाल दिला होता. त्याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या सत्तेने, युपीएने तो अहवाल परत घेतला होता. राम-रामायण मनघडंत आहे."
"तुम्हाला तारक मेहता का उलटा चश्मा बघायची गरज नाही, इथंच राहुल गांधी यांचा उलटा दिमाग… पाहता येईल. आता निवडणुका आल्या की त्यांना राम आठवतो... जिन को राम याद आता है.. वो विदेश मे आराम करता है… त्यांना फक्त हाच राम माहिती आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच मातेच्या मागे उभं राहून राजकारण केलं. आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहून राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरू आहे, कुठे आहे तुमचा पुरुषार्थ?ठ असं म्हणत पूनम महाजन यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"