पालघर: गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अलीकडेच बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. मराठी माणूस पराभूत झाला म्हणून पेढे कसले वाटता? लाज वाटत नाही का, असा हल्लाबोल अप्रत्यक्षरित्या भाजपवर केला होता. यावरून आता आणखी एका भाजप नेत्याने शिवसेनेवर पलटवार केला असून, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का, अशी विचारणा केली आहे. (bjp prasad lad replied shiv sena sanjay raut over criticism after belgaum election result)
“शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष वापर करून घेतोय”; भाजपची टीका
बेळगाव महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा पराभव झाला होता. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली होती. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसे गेली अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता. याला आता भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसने सातत्याने मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का, असा थेट सवाल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल
बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय
बेळगावचा विजय हिंदुत्वाचा विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे. बेळगावचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही. बेळगावचा पराभव संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायची की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?, अशी विचारणा लाड यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार
बेळगावचा विजय झांकी है
बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है. भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय मुंबईला राऊतांना दिसायला लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरारसह इतर ठिकाणीही मराठी माणूस भाजपसोबत खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त करत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी असून, पाठीत खंजीर कोणी घुसवला त्यांनाच माहीत आहे. निवडणूक एकत्र लढवून शरद पावरांशी हात मिळवणून कोणी केली हे जगजाहीर आहे, या शब्दांत प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे.