Bengal Post-Poll Violence: वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प; भाजपचे शिवसेनेवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:20 PM2021-05-04T20:20:16+5:302021-05-04T20:22:47+5:30
Bengal Post-Poll Violence: बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. मात्र, यानंतर आता बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. भाजपकडून आता शिवसेनेवर टीका केली आहे. वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, असा निशाणा साधण्यात आला आहे. (bjp pravin darekar criticises uddhav thackeray over west bengal post poll violence)
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणे, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 4, 2021
बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे!
जय श्रीराम! #BengalBurning
कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
“असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले
बंगालमध्ये गमावण्यासारखं काहीही नव्हतं
बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पण आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!, असे प्रवीण दरेकर यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”
महाराष्ट्रात भाजपकडून निदर्शने
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
दरम्यान, ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.