Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:08 PM2021-05-26T16:08:05+5:302021-05-26T16:10:47+5:30

Maratha Reservation: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

bjp pravin darekar replied sachin sawant over maratha reservation | Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”

Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”

Next
ठळक मुद्देमराठा आरक्षणावरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हेमराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नकाप्रवीण दरेकर यांचे सचिन सावंत यांना प्रत्युत्तर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे सरकार आणि विरोधक एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका, असे म्हटले आहे. (bjp pravin darekar replied sachin sawant over maratha reservation)

गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वेळ मागत असून, अद्यापही पंतप्रधान भेटण्यासाठी तयार नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली होती. सचिन सावंत यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. 

निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग

उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!, असे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे. 

काय म्हणाले होते सचिन सावंत?

चंद्रकांत पाटील, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला होता. 
 

Web Title: bjp pravin darekar replied sachin sawant over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.