शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 7:48 PM

भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.

मुंबई - भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाचे समसमान वाटप यावर शिवसेने आग्रह धरल्याने भाजपा आणि शिवसेनेमधील सत्तास्थापनेबाबतची चर्चा  थांबली आहे. मात्र असे असले तरी भाजपाने मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आणि नव्या सरकारच्या शपथविधीसाठी तयारी सुरू केली आहे.  नव्या सरकारच्या शपथविधीसाठी  5 नोव्हेंबरची तारीख निश्चित करत भाजपाने वानखेडे स्टेडियम बूक केले आहे. आता बीसीसीआयच्या परवानगीनंतर भाजपाला शपथविधीसाठी स्टेडियम मिळणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली. त्याआधी सरकारच्या शपथविधीसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची निवड कऱण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या अहवालानंतर हे ठिकाण बदलण्यात आले.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच भाजपा आणि शिवसेना महाआघाडील स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना राज्यात सत्तास्थानांचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत दिलेले आश्वासन भाजपाने पाळावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. एकीकडे भाजपाने दिलेले आश्वासन पाळावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह कुठलेही महत्त्वाचे खाते शिवसेनेस देण्यास तयार नाही.विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या असून, शिवसेनेला 7 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला आहे. महत्त्वाच्या बातम्या कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासनझारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण