शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शपथविधीचा मुहूर्त ठरला, बड्या नेत्याला निरोप गेला; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 2:48 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यात कुठल्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नंदनवन बंगल्यात बैठक सुरू आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या यादीवर खलबतं करण्यात आली. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर संभाव्य मंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. विखे पाटील यांना मुंबईतून निरोप आल्याचं समजतं. निरोप आल्यानंतर मतदारसंघात असणारे विखे पाटील मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. तत्पूर्वी शिर्डी येथे जात विखे पाटील यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी विखे पाटलांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. 

कोण आहे राधाकृष्ण विखे पाटील?२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. काँग्रेस काळात विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण, परिवहन आणि शिक्षण खात्याचा कारभार होता. विधानसभेत शिर्डी मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे. 

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र एक महिना झाला तरी विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तार कधी असा सवाल सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात येत होते. 

मोठी बातमी! २४ तासांत शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी? 

नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात होता. मागील महिनाभरात शिंदे यांनी तब्बल ६ हून अधिक वेळा दिल्ली गाठली. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. खातेवाटपावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्याचसोबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी लांबत चालल्याने विस्तार रखडला असंही बोलले जायचे. परंतु निती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत परतले त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्यात. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती आहे. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे