शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:04 PM

सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला. यावरूनचच भाजपाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई - 'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही.  सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये' असा इशारावजा सल्ला शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला. यावरूनचच भाजपाने महाविकास आघाडी सरकारला आता टोला लगावला आहे. सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे.  

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असताना सरकारला मात्र फक्त खुर्चीची चिंता आहे असा टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील मंडळी खाटेवरून चर्चा करत असल्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील रुग्णालयात खाट (बेड) उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सध्याचं चित्र आहे. असं असताना यांना लोकांच्या मृत्यूची चिंता नसल्याने त्याचं दु:ख होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी फक्त खुर्चीच्या विचारात मग्न आहे. सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली?, काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे. 

उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे ठरले. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला देताना काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.  

विधान परिषदेच्या जागांवरूनही काँग्रेसला शिवसेनेने सुनावले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागा वाटप व्हायला हरकत नसल्याचे सांगत त्यांना विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यासाठी शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद काँग्रेसला दिले, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. काँग्रेसला जागांच्या प्रमाणात खूप काही मिळाले. समान वाटप झाले असते तर एवढे मिळालेच नसते, असा टोला लगावतना मुख्यमंत्र्यांना त्या बदल्यात सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही. यामुळे पुन्हा पहाटे राजभवनाचे दरवाजे उघडले जातील अशा भ्रमात राहू नये, असा इशारा काँग्रेससह भाजपाला देण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस