शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 2:40 PM

राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपाचे नेतेमंडळी ठाकरे गटावर चांगलेच तुटून पडले आहेत.

BJP vs Shivsena: शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखाली ४० आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. मात्र काही कारणास्तव शिवसेनेतून आमदारांनंतर आता माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेच उरतील असा टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्यानंतर आता भाजपाचे आमदारा राम कदम यांनी नाव न घेता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून शिवसेनेला ट्रोल केले.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या धोरणांवर सातत्याने टीका करणारे भाजपा आमदारा राम कदम यांनी उद्धव ठाकरेशिवसेना यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुंबईतील मनपा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. यामध्ये 'संपवून दाखवलं!' इतकाच मजकूर लिहिण्यात आला होता. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसले. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात 'करुन दाखवलं' ही टॅगलाईन वापरली होती. त्याचाच धागा पकडत राम कदम यांनी 'संपवून दाखवलं' असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचलं.

दरम्यान, भाजपाचे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेवर काल तोंडसुख घेतलं. "महाराष्ट्रात सरकार आल्याचा आनंद झाला. पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी ९२ पैकी ८२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू" असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला होता.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Kadamराम कदमShiv Senaशिवसेना