ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - विदर्भातल्या नऊपैकी आठ नगर पालिकांचे पूर्ण निकाल हाती आले आहेत. भाजपानं 73 जागा मिळवत दरारा कायम ठेवला आहे. नागपुरातील 9 पैकी 5 जागांवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर काँग्रेस 1 आणि इतर 3 जण निवडून आले आहेत. काटोल येथे विदर्भ माझाने आपला दबदबा निर्माण केला आहे. विदर्भ माझाने इथं एकहाती सत्ता मिळवली आहे.
विदर्भातल्या जवळपास 185 जागांपैकी 153 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपनं आघाडी घेतली आहे. तर नव्या दमाच्या विदर्भ माझा पक्षानंही चांगलं यश संपादन केलं आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस आणि विदर्भ माझाला जागा मिळाल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार, विदर्भात 73 जागांवर घवघवीत यश मिळवून भाजपानं वरचष्मा ठेवला आहे. काँग्रेसनं 34 जागांवर, तर विदर्भ माझानं जवळपास 18 जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत 11 पैकी 9 पालिकांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाने 4, काँग्रेस , राष्ट्रवादी, विदर्भ माझा यांना प्रत्येकी एका पालिकेत विजय मिळवता आला आहे. तर 2 जागांवर स्था. आघाडीने विजय संपादन केला आहे. 11 नगराध्यक्षांपैकी सध्या भाजपाने सहा जागांवर यश मिळवले आहे.
पक्षीय बलाबल : एकूण जागा 185 पैकी 153 जाहीर
(कामठी वगळता)
भाजप - 73
सेना - 05
काँग्रेस - 34
राष्ट्रवादी - 08
विदर्भ माझा - 18
शेकाप - 04
अपक्ष - 02
नगर विकास आघाडी - 05
-------
रामटेक
एकूण 17 जागा
भाजप -13
कॉंग्रेस-02
शिवसेना-02
नगराध्यक्ष दिलीप देशमुख (भाजप)
-------
खापा
एकूण 17 जागा
भाजप-15
कॉंग्रेस-01
अपक्ष-01
नगराध्यक्ष प्रियंका मोहिटे (भाजप)
----
कळमेश्वर
एकूण 17 जागा
भाजप-05
कॉंग्रेस-08
सेना-02
राष्ट्रवादी-02
नगराध्यक्ष स्मृती इखार (भाजप)
---
सावनेर
एकूण जागा 17
भाजप-12
कॉंग्रेस-04
नगराध्यक्ष रेखा मोवाडे (भाजप)
----
उमरेड
एकूण जागा 25
भाजप-14
कॉंग्रेस-06
पाच जागांचे निकाल यायचे आहे.
---------------------------
नरखेड
एकूण जागा 17
राष्ट्रवादी- 08
शिवसेना- 03
नगर विकास आघाडी -06
नगराध्यक्ष अभिजित गुप्ता (अपक्ष -नगर विकास आघाडी)
---
कामठी
कॉंग्रेस-04
भाजप-01
शिवसेना-01
बसप-01
अपक्ष-01
---------
काटोल
एकूण जागा 20
विदर्भ माझा-15
शेकाप-04
भाजप-01
नगराध्यक्ष वैशाली ठाकूर (विदर्भ माझा)
---
मोहपा
एकूण जागा 17
कॉंग्रेस-10 भाजप-05