मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि अन्य विषयांवरून राजकारण तापलेले दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटी-गाठी सुरू केल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार संभाजीराजेंनी भेट घेतली. राज ठाकरे यांचे माझ्या भूमिकेला समर्थन आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. (bjp sambhaji raje meets mns raj thackeray over maratha reservation)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर आता संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ते याच मुद्द्यावरून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. गुरुवारी सकाळी संभाजीराजे यांनी सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले. या भेटीत राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत संभाजीराजे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
“थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला
राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी
राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नातं छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे आजही आहे. शिवाय किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर आमचे एकमत आहे. त्यामुळे किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाली, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”
समाजासाठी गाठी-भेटी घेतोय
सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतोय. माझ्यासाठी नाही तर समाजासाठी. सकाळी पवार साहेबांना भेटलो. उद्या देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनाही भेटणार आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं आरक्षण रद्द केलं आहे. त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठीचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.
ब्लॅक फंगसवरील औषधांवर इतका टॅक्स कशासाठी? हायकोर्टाचा केंद्राला थेट सवाल
शरद पवारांनी पुढाकार घ्यावा
मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितले. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती केल्याची माहिती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.