भारत चव्हाण -कोल्हापूर -लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न् बसतो तोच आता कोल्हापूर महानगरपालिके च्या निवडणुकीचे वेध आतापासूनच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे, तसेच प्रभागनिहाय चांगली मते मिळाल्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कमालीचे उत्साही वातावरण तयार झाले असून, ‘मिशन महापालिका’चे नियोजन सुरू झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पालिकेतील सत्ताधारी पक्षात मात्र सामसूम असून, नेते, उमेदवार, कार्यकर्ते अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. जनसुराज्य तर महापालिकेच्या निवडणुकीतून बाजूला होईल, अशीच परिस्थिती आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने टोल, तसेच एलबीटी लादून शहरवासीयांची व व्यापाऱ्यांची निराशा केली. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत त्यांना बसला. केंद्रातील सत्ता गेली. आता राज्यातील सत्ताही गेली आहे. महापालिकेत नेतृत्व करणाऱ्यांच्या नेत्यांनाही जोरदार झटका बसल्याने तेही सावरलेले नाहीत. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष व शिवसेना कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे. त्यांनी आता ‘लक्ष्य’ महापालिका म्हणून कामाला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना तर आमदार राजेश क्षीरसागर ‘कामाला लागा’ असा सल्ला देत आहेत. भाजपचीही तयारी सुरू... भाजपने मतदानाच्या आकडेमोडीवर अभ्यास सुरू केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काय करायला पाहिजे? प्रभागात सक्षम उमेदवार कोण? जेथे सक्षम उमेदवार नाहीत, तेथे बाहेरील कोणी येऊ शकतो, यासह संघटना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील सरकार स्थापन झाल्यावर शहरात प्रभागनिहाय शाखा सुरू करण्याचा भाजपचा अजेंडा आहे. कदमवाडी येथून त्याचा प्रारंभ होत असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ६० ते ६५ प्रभागांवर सेना, भाजपचा प्रभाव शहरी मतदारांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधातील वातावरण, सरकारकडून लादला गेलेला टोल आणि व्यापाऱ्यांची डोकेदुखी ठरलेला एलबीटी हे रोषाचे मुख्य कारण बनले. हे दोन्ही विषय महापालिकेशी संबंधित आहेत. दोन्ही कर रद्द करण्याचे आश्वासन शिवसेना व भाजप यांनी दिल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान केले. त्याचा परिणाम शहरातील ६० ते ६५ प्रभागांवर या दोन्ही पक्षांचाच प्रभाव राहिला. नेमके यामुळेच शिवसेना-भाजपला महापालिका निवडणूक सोपी बनली आहे.शिवसेनेचे कामाला लागण्याचे आदेशशहरात बहुतांश प्रभागांत शिवसेनेच्या शाखा आहेत. परंतु, सेनेतील दोन गटांतील संघर्षावरून त्यामध्ये विस्कळीतपणा आला आहे. आता शहर प्रमुखपद हे राजेश क्षीरसागर यांचे सहकारी दुर्गेश लिंग्रस व शिवाजीराव जाधव यांच्याकडे आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक आपल्या नेतृत्वाखालीच लढविण्याची तयारी क्षीरसागर यांनी केली असून, तसे आदेश देण्यासही सुरुवात केली आहे.सरकारतर्फेही जाणीवपूर्वक तयारी राज्यात सरकार सत्तेवर आल्यानंतर पुढच्या आठ ते नऊ महिन्यांत महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सरकारतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. टोलमुक्त कोल्हापूर आणि एलबीटी रद्दचा भाजप-शिवसेनेने नाराच दिला आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची ग्वाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली असल्याने तो विषयही मार्गी लागेल, असे दिसते.सेना प्रथम, तर भाजप दुसऱ्या स्थानावरशहरातील ७८ पैकी अनेक प्रभागांत शिवसेनेने काँग्रेस व भाजपपेक्षा आघाडी घेतली आहे. यंदा प्रथमच भाजपने मंगळवार पेठ, वारे वसाहत, बाबुजमाल, महालक्ष्मी मंदिर, ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, शाहूपुरी, शुक्रवार पेठ, कनाननगर, साने गुरुजी, आपटेनगर, राजेंद्रनगर, बाबा जरगनगर येथे चांगले मताधिक्य मिळविले. दक्षिणेतील प्रभागात भाजप प्रथम स्थानावरमहानगरपालिका क्षेत्रातील ५४ प्रभाग हे ‘उत्तर’मध्ये, तर २४ प्रभाग हे ‘दक्षिण’मध्ये येतात. विधानसभा निवडणुकीत ‘उत्तर’मध्ये शिवसेना व भाजप यांनी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ‘दक्षिण’मध्ये तर सर्वच प्रभागांत भाजपने आघाडी घेतली. तेथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. बावडा सेनेच्या मांडवात कसबा बावडा गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसमधीलच धोकाबाजीमुळे शिवसेनेकडे झुकला. परंतु, यंदा मात्र येथे ५०-५० टक्के मते मिळाली.‘उत्तर’मध्ये २ लाख ८४ हजार ७०६ मतदार ‘दक्षिण’ प्रभागात १ लाख १० हजार मतदारशिवसेना-भाजपचा ६० ते ६५ प्रभागांवर प्रभावकाँग्रेसचा १५ प्रभागांवर प्रभाव सध्या शिवसेनेचे ४, तर भाजपचे ३ नगरसेवक
भाजप-सेनेचे ‘मिशन महापालिका’
By admin | Published: October 23, 2014 11:05 PM