लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या राकेश शाह यांनी शिवसेनेच्या अर्चना कदम यांचा पराभव केला. शाह यांना १० तर कदम यांना ६ मते मिळाली.
स्थायी समिती मध्ये भाजपाचे १० ; शिवसेनेचे ४ तर काँग्रेसचे २ असे सदस्य संख्या बळ आहे. सभापती पदासाठी भाजपाच्या राकेश शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेच्या वतीने अर्चना कदम रिंगणात होत्या.
परंतु स्थायी समिती मध्ये भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने शाह यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्या अनुसार आज गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शाह यांना १० मते तर शिवसेनेच्या कदम यांना सेनेची ४ व काँग्रेसची २ अशी एकूण ६ मते मिळाली. शाह यांच्या विजया नंतर भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्ते आदींनी जल्लोष केला.