मुंबई - पावसाच्या बॅटिंगमुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे. यावरूनच आता विरोधकांनी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. मुंबईतील परिस्थितीला महानगरपालिका जवाबदार असून,'भाजप-शिवसनेने करून नाही, तर भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.
मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनके भागातील घरांमध्ये पाणी साचले असल्याचे चित्र आहे. यावरून धनंजय मुंडेंनी भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे.सत्तेत असलेल्या भाजप-सेनेचा दावा होता की, कितीही पाऊस झाला तरीही मुंबई ठप्प होऊ देणार नाहीत. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला आहे. तर 'भाजप-शिवसनेने करून नाही, तर तुडुंब भरून दाखवलं' असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी लगावला आहे.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मलाड सारख्या दुर्घटना होत असून याला फक्त महानगरपालिका जवाबदार असल्याचे आरोप मुंडे यांनी लगावला आहे.