शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपाला धक्का, पटोलेंचा रामबाण काँग्रेसच्या भात्यात, काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघडपणे टीका करण्याचे धाडस दाखविणारे आणि शेतक-यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भाजपाला जोरदार धक्का बसला आहे

नंदू परसावारभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघडपणे टीका करण्याचे धाडस दाखविणारे आणि शेतक-यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भाजपाला जोरदार धक्का बसला आहे, तर मोदींवर सुटलेला हा रामबाण आपल्या भात्यात आल्याने काँग्रेसमध्ये आनंदी आनंद आहे. जिल्हा परिषद सदस्य ते लोकसभा सदस्य असा पटोले यांचा चढता राजकीय आलेख आहे. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी १९८७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर, सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधले. १९९४ची विधानसभा निवडणूक लाखांदूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढल्यानंतर, पुढच्या दोन्ही निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या आहेत.‘नानाभाऊ’ या टोपण नावाने परिचित असलेले पटोले यांची एक ‘लढाऊ नेते’ अशीच ओळख आहे. राजकीय परिणामाची चिंता न करता, आजवर त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर स्वपक्षावर टीका करताना मागेपुढे पाहिले नाही.

काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आघाडी सरकारच्या शेतकºयांप्रती उदासीन धोरणांविरुद्ध आवाज उठवून, डिसेंबर २००८मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, २००९ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. २००९च्या साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवारीवर विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले. पुढे २०१४मध्ये भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.पटोले का नाराज?भाजपामधील सर्वच नेते, मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गात असताना, पटोले यांनी मात्र त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने भाजपामध्ये भूकंप झाला होता. मे महिन्यात दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, मोदींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बसायला लावले. तेव्हापासून पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.आता पुढे काय?पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पटोले यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सहा महिन्यात निवडणुका होतील. तेवढ्या अल्प काळात भंडारा-गोंदिया या दोन जिल्ह्यांत सक्षम उमेदवार शोधताना भाजपाला कसरत करावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे २०१८ मध्ये होणारी पोटनिवडणूक ते लढण्याची शक्यता कमी आहे. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली आहे. त्यावरून ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दिसून येते.मोदी-फडणवीसांवर टीकास्रस्वपक्षाच्या धोरणांवर नाराज असलेले पटोले यांनी जुलै महिन्यात नागपुरात एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरुद्ध टीका करीत, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी शेतकºयांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस